FYJC Online Admission 2020 संकेतस्थळ १ जुलैपासून सुरू

FYJC Admission 2020: अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाइट १ जुलैपासून सुरू होणार आहे. या वेबसाइटवर ज्युनियर कॉलेज नोंदणी करू शकतात. दक्षिण, पश्चिम आणि उत्तर मुंबईतील कॉलेज १ जुलैला तर ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेतील कॉलेज २ जुलैला वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. तसेच यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती देण्यासाठी विभागनिहाय ऑनलाइन प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. शिक्षण उपसंचालकांनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, '२०१९-२० मध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR Region) सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे लॉगिन आयडी व पासवर्ड २०१९-२० मध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या माहितीतील आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवर १ जुलै २०२० पासून पाठवण्यात येतील. त्या लॉगिन, पासवर्डच्या सहाय्याने २०२०-२१ या वर्षाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीमध्ये काही बदल असल्यास तो अकरावी ऑनलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन करावा. हे संकेतस्थळ १ जुलै २०२० पासून सुरू होणार आहे.' हेही वाचा: प्रशिक्षण ऑनलाइन कोविड - १९ प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदा शाळा महाविद्यालयांना विभागनिहाय ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंकही विभागाने दिली आहे. meet. google.com/ktb-cwsq-dmq या गुगल लिंकद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले. विभागनिहाय प्रशिक्षण पुढीलप्रमाणे होणार आहे - विभाग - तारीख - वेळ दक्षिण मुंबई - १ जुलै २०२० - सकाळी ११ ते दुपारी १२ पश्चिम मुंबई - १ जुलै २०२० - दुपारी १ ते २ उत्तर मुंबई - १ जुलै २०२० - दुपारी ३ ते ४ ठाणे मनपा / मिरा-भाईंदर मनपा - २ जुलै २०२० - सकाळी ११ ते दुपारी १२ कल्याण-डोंबिवली मनपा - २ जुलै २०२० - दुपारी १ ते २ नवी मुंबई मनपा / पनवेल / उल्हासनगर मनपा / अंबरनाथ नपा / बदलापूर नप - २ जुलै २०२० - दुपारी ३ ते ४


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YIoP9e
via IFTTT

Post a Comment

0 Comments