MHT-CET: बारावी बोर्ड डिटेल्स भरण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने साठी बारावीचा तपशील भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी आत ७ जून रोजी रात्री पर्यंत हे तपशील भरू शकणार आहेत. या प्रक्रियेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत त्यांना त्यांच्या बारावी बोर्डाचे तपशील भरायचे आहेत. तपशील भरण्यासाठी दिलेल्या लिंकवर जाऊन Name of the HSC Board appearing हा पर्याय निवडायचा आहे. यापूर्वीही सीईटी कक्षाने एमएचटी-सीईटीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे बारावी बोर्डाचे तपशील भरण्यास सांगितले होते. ही प्रक्रिया २३ मे रोजी संपणार होती. MHT-CET परीक्षा बीई / बीटेक आणि बी. फार्म / डी. फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाते. बीएससी (ऑनर्स) आणि बी.टेक इन अॅग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठीही सीईटीचे गुण ग्राह्य धरले जातात. यंदा ही परीक्षा एप्रिल महिन्यात होणार होती. पण लॉकडाऊनमुळे ती लांबणीवर पडली. MHT-CET परीक्षा आता जुलै महिन्याच्या ४,६,७,८,९,१०,१३,१४,२८, २९,३० आणि ३१ तसेच ऑगस्ट महिन्यातील ३,४ आणि ५ या तारखांना होणार आहे. सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gTrROY
via IFTTT

Post a Comment

0 Comments