NEET 2020: परीक्षा प्रलंबित? खरं काय ते जाणून घ्या

सोशल मीडियावर परीक्षेशी संबंधित नॅशनल टेस्ट एजन्सीची (NTA) चं एक बनावट प्रसिद्धीपत्रक व्हायरल होत आहे. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने या प्रसिद्धीपत्रका संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रसिद्धीपत्रकात असा दावा केला आहे की नीट - यूजी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. मे मध्ये प्रलंबित झालेली परीक्षा २६ जुलै रोजी होणार आहे. ही परीक्षा आधी ३ मे रोजी होणार होती, पण लॉकडाऊनमुळे ती स्थगित झाली होती. ही परीक्षा नियोजित वेळेनुसार २६ जुलै रोजी होणार आहे. परीक्षा स्थगित केल्याची कुठलीही नोटीस, परिपत्रक एनटीएने जारी केलेलं नाही. नीट यूजी परीक्षेचं आयोजन वर्षातून केवळ एकदाच होते. नीट यूजी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातील मान्यता प्राप्त मेडिकल आणि डेंटल महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी मिळते. यंदा सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. काय म्हटलंय पीआयबीने ट्विटरद्वारे...वाचा - करोना संक्रमणामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय एनटीएने घेतला आहे. परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये किमान २ मीटर एवढं अंतर ठेवले जाईल. आधी हे अंतर एक मीटर किंवा त्यापेक्षा थोडे कमी असायचे. करोनामुळे निर्माण झालेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार हे अंतर राखण्यात येईल. यासाठी परीक्षा केंद्रेदेखील वाढवण्यात आली आहेत. यापूर्वी देशभर तीन हजार परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत असे. यंदा ही केंद्रे वाढवून सहा हजार करण्यात आली आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y7oJHS
via IFTTT

Post a Comment

0 Comments