व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्दच; PM मोदींना ठाकरेंचं पत्र

देशातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांनी या अभ्यासक्रमांच्या महाराष्ट्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या सविस्तर पत्रात महाराष्ट्राला कोविड-१९ च्या वाढत्या संक्रमण स्थितीत या परीक्षा घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. विद्यापीठांनी ठरवलेल्या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील बिगर व्यावसायिक (non-professional) अभ्यासक्रमांच्या यादीत बीए, बीकॉम आणि बीएससी यांचा समावेश आहे. तर कायदा, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम, स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर), फार्मसी हे अभ्यासक्रम व्यावसायिक (professional) यादीत मोडतात. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल काऊन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशन या विविध इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या शिखर संस्था आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YzGkZl
via IFTTT

Post a Comment

0 Comments