Also visit www.atgnews.com
SSC CGL 2017 परीक्षा उत्तीर्णांना अद्याप नियुक्तीची प्रतीक्षा
Staff Selection Commission: कर्मचारी निवड आयोगाच्या सीजीएल २०१७ परीक्षेच्या यशस्वी उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. ही परीक्षा आयकर विभागातील अधिकारी पदांसाठी झाली होती. सीजीएल २०१७ चा निकाल लागून आठ महिने उलटून गेले तरी उमेदवारांना नियुक्ती मिळालेली असल्याने हे उमेदवार नाराज आहेत. सीजीएल २०१७ परीक्षेद्वारे आयकर विभागात २६१ इन्स्पेक्टर्स आणि १७२१ टॅक्स असिस्टंट्स पदांवर उमेदवारांची निवड झाली होती. या उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्राची प्रतीक्षा आहे. संतप्त उमेदवारांनी शनिवारी ट्विटरवर एक मोहीम चालवली होती. #INCOMETAX_CGL17_JOINING_DO या हॅशटॅगसह २० हजारहून अधिक ट्विट केले गेले. एका उमेदवाराने टि्वट केलंय की आयुष्यातली ३ वर्षं यासाठी दिली आणि हाती केवळ प्रतीक्षा लागली. अन्य एक उमेदवाराने ट्विट करून लिहिलं की दोन हजारांहून अधिक उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय नैराश्येत आहेत. कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी. एका उमेदवाराने लिहिलंय की 'इनकम टॅक्सने असिस्टंट आणि इन्स्पेक्टर पदासाठी सीजीएल २०१७ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. साडेतीन वर्षं जुन्या रिक्त जागा आहेत आणि निकाल लागूनही सात महिने उलटून गेले आहेत. कृपयचा न्याय द्यावा.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YXPrBV
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments