Also visit www.atgnews.com
SSC SI Notification: सब इन्स्पेक्टरच्या १,५६४ पदांसाठी भरती
CAPF SI Recruitment 2020: (SSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) आणि दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षकांच्या पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. आयोग एकूण १,५६४ पदांची भरती करणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १६ जुलै २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिक्त पदांविषयी अधिक माहिती पुढे दिली आहे. महत्त्वपूर्ण तारखा अर्ज प्रक्रियेला सुरुवात : १७ जून २०२० अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ जुलै २०२० ऑनलाइन अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख: १८ जुलै २०२० चलान जनरेट करण्याची शेवटची तारीख : २० जुलै २०२० चलान द्वारे ऑफलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २२ जुलै २०२० चालानद्वारे फी जमा करण्याची शेवटची तारीख : २२-०7 -2020 संगणक आधारित परीक्षा (पेपर 1) तारीख: २९ सप्टेंबर २०२० ते ५ ऑक्टोबर २०२० संगणक आधारित परीक्षा (पेपर 2) : १ मार्च २०२१ पदांचा तपशीलदिल्ली पोलीस: एसआय पदे - १६९ (त्यापैकी ९१ पदे पुरुषांसाठी तर ७८ पदे महिलांसाठी आरक्षित) CAPF: १३९५ पदे (त्यापैकी १३४२ पदे पुरुषांसाठी तर ५३ पदे महिलांसाठी आरक्षित) हेही वाचा: अशी होईल निवड संगणक आधारित परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा म्हणजेच पेपर १ २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दुसर्या पेपरमध्ये हजर राहावे लागेल. १ मार्च २०२१ रोजी पेपर २ आयोजित केले जाईल. यानंतर, वैद्यकीय तपासणी होईल आणि यशस्वी उमेदवारांची कागदपत्रांद्वारे पडताळणी केली जाईल आणि त्यांची नेमणूक केली जाईल. हेही वाचा: इच्छुक व पात्र उमेदवार थेट लिंकवर क्लिक करुन अर्ज करू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y9i6oC
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments