UGC NET आणि अन्य परीक्षा अर्जांना मुदतवाढ

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने , , , NCHM JEE 2020 या परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. या परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जून रोजी संपत होती. आता विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. यापूर्वी दोन वेळा एनटीएने ही मुदत वाढवली होती. या परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत सर्वात आधी ३० एप्रिल रोजी संपणार होती. तेव्हा विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर ही मुदत १५ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. लॉकडाऊन काळ, करोना संक्रमण आदींमुळे वेळोवेळी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. nta.ac.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थी अर्ज करू शकतात. यापूर्वी एनटीएने जेईई मेन परीक्षाही पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता जुलै महिन्यात होणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट ही देखील २६ जुलै रोजी होणार आहेत. करोना व्हायरसच्या स्थितीनुसार कोविड - १९ संक्रमणाची स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. करोना संक्रमणामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्ष एक महिना पुढे गेले आहे. उच्च शिक्षण संस्था म्हणजेच विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये १ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा मानस आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Yziz2o
via IFTTT

Post a Comment

0 Comments