UPSC NDA परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) एनडीए आणि एनए परीक्षा (II) २०२० साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. १६ जून रोजी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर या परीक्षांसंदर्भातील नोटिफिकेशन जारी झाले. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. नोंदणी दोन भागात होणार पूर्ण यूपीएससी एनडीए परीक्षेसाठी नोंदणी दोन भागात केली जाईल. पहिल्या भागात उमेदवारांशी संबंधित मूलभूत माहिती द्यायची आहे. त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. दुसऱ्या भागात शुल्कासंबंधी तपशील, छायाचित्र, स्वाक्षरी, ओळखपत्र अपलोड करायचे आहे. तसेच परीक्षा केंद्र निवडायचे आहे. या परीक्षेसाठी पात्रता, शैक्षणिक पात्रतेशी संबंधित माहिती पुढील दिली आहे ... पात्रता - अर्जदार भारत, नेपाळ किंवा भूतानचा नागरीक असावा. - १ जानेवारी १९६२ च्या आधी भारतात कायमस्वरुपी आलेले तिबेटी शरणार्थी असावेत. - उमेदवार भारतात कायमस्वरुपी राहण्याच्या हेतूने भारतचे मूळ निवासी पाकिस्तान, श्रीलंका, केनिया, टांझानिया, युगांडा, मलावी, झांबिया, जायरे आणि इथियोपिया किंवा व्हिएतनामवरून प्रवास करून आलेला असावा. वयोमर्यादा १६ ते १९ वर्षे वैवाहिक स्थिती अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचं वचन देणं अपेक्षित आहे. शैक्षणिक पात्रता आर्मीसाठी - १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उर्तीर्ण. वायू दल आणि नौदलासाठी - १२ वी किंवा समकक्ष परीक्षा फिजिक्स किंवा मॅथ्स घेऊन उत्तीर्ण. परीक्षा पॅटर्न एका लेखी परीक्षेनंतर अंतिम मुलाखत. एनडीएसाठी लेखी परीक्षेत दोन विभाग असतात. ३०० गुणांची गणित आणि ६०० गुणांची जनरल अॅबिलीटी टेस्ट असते. दोन्ही परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात. मुलाखतीसाठी ९०० पैकी गुण असतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ejcFc8
via IFTTT

Post a Comment

0 Comments