Also visit www.atgnews.com
AICTE चे सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी
revised calendar: विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षांसंदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी केल्यानंतर त्या आधारे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेनेदेखील सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जारी केलं आहे. या वेळापत्रकाच्या आधारेच देशातील विविध तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश, परीक्षा आणि वर्गांना सुरूवात होईल. एआयसीटीईने आपली अधिकृत वेबसाईट aicte-india.org वर हे सुधारित कॅलेंडर जारी केलं आहे. यासोबतच एक नोटीसीह AICTE ने जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, 'करोना व्हायरस महामारीमुळे राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. अशात विद्यापीठांच्या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी यूजीसीने दिशानिर्देश जारी केले आहेत. आता यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे एआयसीटीईने तंत्र शिक्षण संस्थांसाठी आपलं शैक्षणिक कॅलेंडर जारी केलं आहे.' करोना महामारीमुळे बदलत असणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालय आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे या कॅलेंडरमध्ये यापुढेही बदल होण्याची शक्यता आहे, असंही एआयसीटीईने या सूचनेत म्हटलं आहे. ज्या संस्थांनी AICTE द्वारे आधी जारी केलेल्या कॅलेंडरच्या आधारे वर्ग सुरू केले असतील, ते एकतर ते वर्ग स्थगित करू शकतात किंवा अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन + ऑनलाइन मोडवर विशेष वर्ग भरवू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iON262
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments