कर्नाटक सीमेवर मराठी भाषिकांसाठी कॉलेज

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर राहणाऱ्या मराठी भाषिकांसाठी मराठी माध्यमाचं कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावलं उचलली आहेत. या भागात मराठी महाविद्यालय सुरू करता येईल का यासंदर्भातील चाचपणीसाठी महाराष्ट्र सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती टि्वटरद्वारे दिली आहे. हे कॉलेज कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र असेल. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी या कॉलेजसाठी पाच एकर जागा उपलब्ध करून देणार आहेत. यानंतर आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातील, असं सामंत यांनी म्हटलं आहे. हे महाविद्यालय पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर या समितीचे अध्यक्ष आहेत. हे कॉलेज कशा पद्धतीने उभारलं जाईल, कोणकोणते अभ्यासक्रम असतील आदी सर्व मुद्द्यांवर ही सहा सदस्यीय समिती काम करणार आहे. कर्नाटक सीमेवर मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YPOiO9
via IFTTT

Post a Comment

0 Comments