Also visit www.atgnews.com
जेईई मेन जानेवारी परीक्षेबाबतच्या निर्णय शाळा उघडल्यानंतरच
करोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा , महाविद्यालये मार्च महिन्यापासून बंद आहेत. आता देशात अनलॉकिंगची प्रक्रिया हळूहळू सुरू असली तरी त्यात शाळा, महाविद्यालयांचा उल्लेख नाही. करोनाची ही परिस्थिती लक्षात घेऊन इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षाही वारंवार पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने JEE Main परीक्षेच्या जानेवारी-सायकलचा आढावा शाळा सुरू झाल्यानंतर घेणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती कशी आहे, त्याचा अंदाज घेऊन एनटीए निर्णय घेणार. एनटीए बोर्ड परीक्षा विशेषत: सीबीएसई बारावी परीक्षा २०२१ मध्ये कधी घेतल्या जातील त्यावरून निर्णय घेईल. शाळा प्रत्यक्ष सुरू होण्याची प्रक्रिया आणखी लांबली आणि त्यामुळे परीक्षाही लांबल्या तर त्याचा परिणाम २०२१ च्या नीट यूजी परीक्षेवर होण्याची दाट शक्यता आहे. अन्य ज्या परीक्षांचा राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांवर परिणाम होणार, त्यामध्ये कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (CMAT) आणि ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT) या परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षा सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतल्या जातात. UGC NET परीक्षा डिसेंबर अखेर होते. JEE Main आणि NEET UG परीक्षा आता जुलैवरून थेट सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे २०२१ च्या अन्य परीक्षांवर याचा परिणाम होणार आहे. सीबीएसईतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर परिस्थिती पुढच्या दोन महिन्यांनंतरही सामान्य झाली नाही तर मात्र बोर्डाला आढावा घ्यावा लागेल आणि २०२१ च्या परीक्षा फेब्रुवारीत सुरू करायच्या का यावर विचार करावा लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iTLMhF
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments