स्टेट बँकेत जम्बो भरती; हजारो पदे रिक्त

SBI Recruitment 2020 notification and application detail: तुम्ही पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं असेल () तुम्हाला सरकारी नोकरीची (Sarkari Nokri) संधी देत आहे. एसबीआयने अधिकाऱ्यांच्या सुमारे चार हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्जाची प्रक्रियाही सुरू केली आहे. या रिक्त पदांचा तपशील आणि बँकेने दिलेल्या अधिकृत अधिसूचनेची लिंक या बातमीत पुढे दिली आहे. एसबीआयने अधिकाऱ्यांच्या पदांवरील रिक्त जागा, रिक्त पदांची माहिती दिली आहे. विविध राज्यांतील एसबीआय शाखांमध्ये नेमणुका करावयाच्या आहेत. कोणत्या राज्यात अधिकाऱ्यांची, किती पदांची भरती होईल, तपशील पाहा - पदांची माहिती गुजरात - ७५० पदे कर्नाटक - ७५० पदे मध्य प्रदेश - २९६ पदे छत्तीसगड - १०४ पदे तमिळनाडू - ५५० पदे तेलंगणा - ५५० पदे राजस्थान - ३०० पदे महाराष्ट्र (मुंबई वगळता) - ५१७ पदे गोवा - ३३ पदे एकूण पदांची संख्या - ३८५० शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी घेतलेले उमेदवार या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा १ ऑगस्ट २०२० पर्यंत उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षणाच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेमध्ये १५ वर्षांपर्यंतच्या सवलतीचा लाभ देखील मिळणार आहे. अर्जाच्या माहिती एसबीआय ऑफिसर व्हेकन्सी २०२० ची अधिसूचना २७ जुलै २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी एसबीआय करिअरच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. पुढे लिंक देण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची तारीख - २७ जुलै २०२० ऑनलाईन अर्ज बंद होण्याची तारीख - १६ ऑगस्ट २०२० सर्वसाधारण, आर्थिक दुर्बल गट आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना ७०० रुपये शुल्क भरावे लागेल. इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया विनामूल्य आहे. निवड प्रक्रिया या पदांवर पात्र उमेदवारांची निवड अर्जाच्या आधारे शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. एसबीआय करियर वेबसाइटवर जाण्यासाठी एसबीआय अधिकारी भरती अधिसूचना २०२० साठी अर्ज करण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hNgY0T
via IFTTT

Post a Comment

0 Comments