Also visit www.atgnews.com
शेतकऱ्याच्या मुलाची कमाल, दहावीला सर्वच विषयात ३५ गुण!!
म.टा. प्रतिनिधी, नगर दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मुलांचे नेहमीच कौतुक केले जाते. मात्र नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यातील घोटण येथील एका विद्यार्थ्याने दहावीला प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवले आहेत. या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे मार्कशीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्याचे कौतुकही केले जात आहे . अमोल नवनाथ घुगे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. शेवगाव येथून सात किलोमीटर अंतरावर घोटण गाव आहे. या गावातील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयात अमोल हा शिक्षण घेतो. त्याची आई अलका व वडील नवनाथ घुगे हे शेती करतात. अमोल देखील त्यांना शेतीच्या कामात मदत करत असतो. त्याने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून त्याला चक्क प्रत्येक विषयात ३५ गुण मिळाले आहेत. मार्कशीट पाहिल्यानंतर त्याच्यासह त्याच्या मित्रांनाही विश्वासच बसला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा नंबर तपासला. मात्र हे मार्कशीट अमोल चे असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी आनंदही व्यक्त केला. दरम्यान, दहावीच्या परीक्षेमध्ये सर्वच विषयात ३५ गुण मिळवण्याचे प्रमाण हे खूपच नगण्य असते. मात्र हा प्रकार नगर जिल्ह्यातील घोटण येथे घडल्यानंतर या मुलाचे मार्कशीट वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. तसेच त्याचे वेगवेगळे व्हिडीओ सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अमोलचे कौतुक केले जात आहे. याबाबत अमोल घुगे यांच्याशी संपर्क केला असता तो म्हणाला, 'सर्वात प्रथम मला मार्कशीट पाहिल्यानंतर विश्वासच बसला नाही. मात्र आपण सर्वच विषयात ३५ गुण मिळवून उत्तीर्ण झालो आहोत. याचा खूप आनंद झाला आहे. आणि त्यांनी मला फोन करून माझे कौतुकही केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3felhjY
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments