आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल ९९.३४ टक्के तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला आहे. देशात आयसीएसई बोर्डाचे दहावीचे एकूण २ लाख ६ हजार ५२५ तर बारावीचे एकूण ८५,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात दहावीचे २३,३१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर बारावीचे ३,१०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. करोना स्थितीमुळे दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. देशभरात आयसीएसई म्हणजेच दहावीला एकूण २,०७,९०२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २,०६,५२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयएससी म्हणजेच बारावीला एकूण ८८,४०९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ८५,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहू शकता - cisce.org results.cisce.org गुणवत्ता यादी नाही यंदा कोविड - १९ च्या परिस्थितीमुळे निकालाची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही, असे आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे. कसा पाहाल निकाल? काउन्सिलच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करा. रिझल्ट्स 2020 या लिंक वर क्लिक करा. कोर्स ऑप्शन वर जाऊन ISCE / ISC 2020 result पैकी एकाची निवड करा. नवे पेज उघडेल. येथे आपलाअपनी युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा टाकून सबमिट करा. निकाल स्क्रीन वर दिसेल. तो डाउनलोड करा आणि एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा. एसएमएसद्वारे असा मिळेल निकाल - through SMS: एसएमएसद्वारे कसा पाहाल निकाल वाचा - जर वेबसाइटद्वारे निकाल पाहताना अडचण आली तर तुम्ही एसएमएसद्वारे देखील निकाल मिळवू शकता. यासाठी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन ICSE किंवा ISC सह आपला युनिक आयडी टाइप करा आणि 09248082883 या क्रमांकावर पाठवा. उदाहरणार्थ, दहावीच्या निकालासाठी टाइप करा - 1234567 बारावीच्या निकालासाठी टाइप करा - ISC 1234567 (*येथे 1234567 च्या ऐवजी आपला युनिक आयडी लिहायचा आहे.) पुनर्परीक्षेची संधी महाराष्ट्रात जशी राज्य मंडळाच्या दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षेला त्याच वर्षी पुन्हा बसण्याची संधी दिली जाते, तशी संधी आयसीएसई बोर्डाने मागील वर्षापासून (२०१९) पासून सुरू केली आहे. जे विद्यार्थी एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण असतील त्यांना याच वर्षी पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे. हेल्पलाइन आयसीएसई बोर्डाच्या हेल्पडेस्कवर खाली दिलेल्या क्रमांकावर किंवा ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता - 1800-267-1760 ciscehelpdesk@orionic.com CISCE च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iNOMw2
via IFTTT

Post a Comment

0 Comments