Also visit www.atgnews.com
सीए फायनल नोव्हेंबर परीक्षेचं वेळापत्रक जारी
CA Exam November 2020: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया () ने यावर्षी नोव्हेंबरमध्ये आयोजित होणारी सीए परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. आयसीएआयने सीए परीक्षेचे वेळापत्रक १५ जुलै रोजी जारी केले आहे. यानुसार सीए फाउंडेशन कोर्स न्यू स्कीम परीक्षा ९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. याच ग्रुप १ च्या इंटरमिडिएट (आयपीसी) परीक्षा ओल्ड स्कीम परीक्षा २ नोव्हेंबरपासून तर ग्रुप २ मधील परीक्षा १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. परीक्षा केंद्र आयसीएआयची सीए परीक्षा देशभरात एकूण २०७ शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. परदेशातही काही शहरांमध्ये या परीक्षेची केंद्रे आहेत. ५ ते २५ ऑगस्टमध्ये अर्जप्रक्रिया सीए परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. यासाठी विद्यार्थी आयसीएआयचं ऑफिशियल संकेतस्थळ icaiexam.icai.org वर जाऊन परीक्षेचा अर्ज भरू शकतील. परीक्षा अर्ज ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२० या कालावधीत भरता येतील. सीए परीक्षेचं वेळापत्रक असं आहे- परीक्षेचं नाव - तारीख सीए फाउंडेशन कोर्स परीक्षा - न्यू स्कीम - ९,११,१५ आणि १७ नोव्हेंबर २०२० इंटरमिडिएट परीक्षा ओल्ड स्कीम - ग्रुप १- २,४,६ आणि ८ नोव्हेंबर २०२० ग्रुप २ - १०,१२,१६ नोव्हेबंर २०२० इंटरमिडिएट परीक्षा न्यू स्कीम - ग्रुप - १ - २,४,६ आणि ८ नोव्हेंबर २०२० ग्रुप - २ - १०, १२, १६ नोव्हेंबर २०२० फायनल कोर्स परीक्षा (ओल्ड आणि न्यू स्कीम) - ग्रुप-१ १,३, ५ आणि ७ नोव्हेंबर २०२० ग्रुप - २ - ९, ११, १५, १७ नोव्हेंबर २०२०
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eGO0Oe
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments