Also visit www.atgnews.com
मुंबईत नोकरीची संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती
Bharat Electronics Limited (BEL) recruitment 2020: जर तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल तर केंद्र सरकारी कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये तुम्हाला नोकरीची संधी आहे. बीईएल मध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर आणि ट्रेनी इंजिनीअर या दोन पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. बीईएलची अधिकृत वेबसाइट bel-india.in द्वारे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी आवश्यक माहिती, नोटिफिकेशन, अर्जाची लिंक, अधिकृत संकेतस्थळाची थेट लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे. पदांची माहिती प्रोजेक्ट इंजिनीअर - ३० पदे ट्रेनी इंजिनीअर - २५ पदे एकूण पदांची संख्या - ५५ अर्जांची माहिती या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ जुलै २०२० पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २ ऑगस्ट २०२० आहे. हेही वाचा: एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. अन्य उमेदवारांकरिता ट्रेनी इंजिनीअरसाठी २०० रुपये तर प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्याचं शुल्क ५०० रुपये आहे. आवश्यक पात्रता उमेदवारांकडे मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठाची बीई किंवा बीटेक् पदवी आवश्यक. बीई किंवा बीटेक् इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इ अँड टी / टेलीकम्युनिकेशन / ईईई / मेकॅनिकल शाखेतून केलेले असावे. हेही वाचा: वयोमर्यादा ट्रेनी इंजिनीअर पदांसाठी उमेदवारांचे वय जास्तीत जास्त २५ वर्षे आणि प्रोजेक्टे इंजिनीअरसाठी जास्तीत जास्त २८ वर्षे वयोमर्यादा आहे. आरक्षण नियमानुसार सवलतीचा लाभ मिळेल. वयाची गणना १ जुलै २०२० पर्यंत केली जाईल. निवड प्रक्रिया इच्छुक आणि योग्य उमेदवारांची निवड गुणवत्ता यादी आणि मुलाखतीच्या आधारे होईल. हेही वाचा: भरती कुठे? ट्रेनी इंजिनीअरच्या २० पोस्ट मुंबईत भरल्या जाणार आहेत तर प्रोजेक्ट इंजिनीअरच्या ३० पोस्ट बंगळुरूतील आहेत. हेही वाचा: या भरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी संबंधित प्रोजेक्टच्या लिंकवर क्लिक करा - अर्ज करण्यासाठी BEL च्या वेबसाइटवर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2CLneHB
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments