गेट परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची बुधवारी अंतिम मुदत

Registration: गेट परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवारी ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. आयआयटी मुंबईने गेल परीक्षेसाठी अर्ज आपल्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitb.ac.in वर उपलब्ध करून दिले आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी बुधवारी अखेरची संधी आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेट परीक्षा आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी https://ift.tt/30VYu8P या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावयाचा आहे. ची आयोजक संस्था आयआयटी मुंबई आहे. ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी २०२१ आणि १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत. गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल. GATE 2021: काही महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची अखेरची तारीख - ३० सप्टेंबर २०२० विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख - ७ ऑक्टोबर २०२० अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख - ८ जानेवारी २०२१ - ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१ निकाल - २२ मार्च २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n14CWj
via IFTTT

Post a Comment

0 Comments