'या' सोप्या पद्धतीने पाहा दहावीचा निकाल

SSC Result 2020: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी जाहीर होत आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दुपारी १ वाजल्यापासून पाहता येणार आहे. कोणकोणत्या वेबसाइटवर निकाल पाहता येईल, कसा पाहायचा निकाल हे तपशीलवार जाणून घ्या... पुढीलपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर निकाल पाहू शकाल - या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. कसा पाहाल निकाल? विद्यार्थी आपला बारावी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट पाहू शकतात. पुढील स्टेप्सद्वारे निकाल पाहता येईल. - निकाल पाहण्यासाठी या अधिकृत वेबसाईटवर जा - त्यानंतर Maharashtra क्लिक करा - त्यानंतर एक विंडो सुरु होईल. - इथे आपला बैठक क्रमांक म्हणजेच सीट नंबर आणि आईचं नाव टाकून सबमीट करा. - त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. - माहितीसाठी तुम्ही या निकालाचं प्रिंटही घेऊ शकाल. महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२० - ग्रेडिंग सिस्टम गुण -- श्रेणी ७५% आणि पुढे-- डिस्टिंक्शन ६०% आणि पुढे -- प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास) ४५% ते ५९% -- द्वितीय श्रेणी (फर्स्ट क्लास) ३५% ते ४४% -- उत्तीर्ण श्रेणी (पास क्लास) ३५% पेक्षा कमी --अनुत्तीर्ण गुणपडताळणी ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना https://ift.tt/2DB6WB5 या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. महत्त्वाच्या तारखा - गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२० छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/310iMgp
via IFTTT

Post a Comment

0 Comments