SSC Result 2020 Live Updates: निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार

गेले अनेक दिवस लाखो विद्यार्थी उत्कंठेने ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होती, तो दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होत आहे. करोनाचे सावट राज्यातल्या कोणत्या महत्त्वाच्या परीक्षेवर आले तर ते दहावीच्या. बारावीची परीक्षा तोवर उलटून गेली होती, मात्र दहावीच्या भूगोल विषयाच्या मुख्य विषयासह काही अन्य विषयांची परीक्षा लॉकडाऊन पुकारण्यात आला त्यावेळी शिल्लक होती. परिणामी यंदा अनेक वर्षांनंतर प्रथमच भूगोलाचा पेपर रद्द करण्याची वेळ राज्य मंडळावर आली. विद्यार्थ्यांना या विषयाचे सरासरी गुण दिले जाणार असून त्यासह उर्वरित विषयांचा निकाल आज जाहीर होत आहे...निकालाचे सर्व ताजे अपडेट्स तुम्ही येथे जाणून घ्या... - कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार निकाल? - शिक्षणमंत्र्यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा - निकालास विलंब गेल्या वर्षी ७ जून २०१९ रोजी दहावीचा निकाल घोषित करण्यात आला होता. यंदा कोविड - १९ संसर्गाच्या संकटामुळे निकालाला जवळपास दोन महिन्यांचा विलंब झाला आहे. - २०१९ मध्ये कसा होता दहावीचा विभागनिहाय निकाल? कोकण- ८८.३८ टक्के कोल्हापूर- ८६.५८ टक्के पुणे- ८२.४८ टक्के नाशिक- ७७.५८ मुंबई- ७७.०४ टक्के औरंगाबाद - ७५.२० लातूर- ७२.८७ अमरावती- ७१.९८ नागपूर- ६७.२७ - मागील वर्षीचा निकाल खूप कमी २०१८-१९ या वर्षीचा म्हणजेच मागील वर्षीचा निकाल खूप कमी लागला होता. मागील वर्षी प्रथमच विद्यार्थी नव्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देत होते. त्याचा परिणाम निकालावर जाणवला आणि निकाल तब्बल १२.३१ टक्क्यांनी घसरला होता. २००६ नंतरचा हा सर्वात कमी निकाल होता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gcFxnI
via IFTTT

Post a Comment

0 Comments