Also visit www.atgnews.com
आयबी बोर्डाच्या निकालात मुंबईच्या विद्यार्थ्यांची सरशी
मुंबई: शहरातल्या इंटरनॅशनल बोर्डाच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी International Baccalaureate Diploma Programme (IBDP) परीक्षेत परफेक्ट स्कोअरच्या जवळपास जाऊन यश मिळवले आहे. आयबीने बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल रविवारी जाहीर केला. कोविड - १९ महामारीमुळे इंटरनॅशनल बोर्डाने अकरावी, बारावीच्या डिप्लोमा अभ्यासक्रम आणि करिअर रिलेटेड प्रोग्राम परीक्षा रद्द केल्या. या परीक्षा ३० एप्रिल ते २२ मे या कालावधीत होणार होत्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्सवर्कचे गुण आणि संभाव्य ग्रेड यांच्या आधारे गुण देण्यात आले. हे गुण आणि संभाव्य ग्रेड शाळांनी बोर्डाकडे पाठवल्या. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या (DIAS) १०२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी चार विद्यार्थ्यांनी ४५ हा परफेक्ट स्कोर पटकावला. निहारिका घोषाल, इशिता गुप्ता, अमन लडिया आणि माया सिंगापुरी अशी या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत. जुहू येथील जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूलच्या नीहा गुप्ता या विद्यार्थीनीने ४३ गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला. या शाळेच्या ९९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. इतर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी पॉइंट्स ३५ होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z62rHb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments