Also visit www.atgnews.com
CBSE बोर्डाने ९वी ते १२ वीचा अभ्यासक्रम केला कमी
Reduction: कोविड - १९ विषाणू्च्या संक्रमणामुळे विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. बोर्डाने यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी यासंबंधीची माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने (CBSE) यंदा अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. अर्थात ही कपात करताना अभ्यासाच्या गाभ्याला धक्का लावला जाणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने सीबीएसईला सिलॅबस कमी करण्यास सहकार्य केले. एखादा पाठ अभ्यासातून पूर्णपणे वगळण्यापेक्षा एखाद्या पाठाचे काही टॉपिक किंवा संकल्पना हटवली जाऊ शकते का याबाबतच्या सूचना सीबीएसईने एनसीईआरटीकडून मागवल्या होत्या. एखादा टॉपिक किंवा थीमची काही पाठांमध्ये पुनरावृत्ती होत असेल तर तो टॉपिक हटवला जाऊ शकतो. अशा पद्धतीने दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे. सीबीएसई संलग्न शाळांमधील आठवी आणि त्याहून खालील इयत्तांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याची सवलत त्या शाळांना देण्यात आली आहे. अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय सर्वात आधी आयसीएसई बोर्डाने घेतला. मागील आठवड्यात CISCE बोर्डाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. जर शाळा ऑगस्ट महिन्यापर्यंत सामान्यपणे सुरु झाल्या नाही तर अभ्यासक्रमात आणखी कपात करण्यात येईल असेही आयसीएसई बोर्डाने जाहीर केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Z7obTa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments