Also visit www.atgnews.com
पदवी परीक्षांसंदर्भातील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
hearing on plea against UGC final year exams circular: पदवी परीक्षांसंदर्भातील सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने ६ जुलै २०२० रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करत देशातील सर्व विद्यापीठांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे यूजीसीचे म्हणणे आहे तर महाराष्ट्रासह अनेक राज्यात कोविड १९ महामारीमुळे परीक्षा घेण्यायोग्य स्थिती नाही. यासंदर्भात यूजीसीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांाच परीक्षांना विरोध आहे. यूजीसीच्या गाईडलाइन्सविरोधात देशातली १३ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातून विविध ३१ विद्यार्थ्यांनी मिळून २७ याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. महाराष्ट्रातीन युवा सेना या विद्यार्थी संघटनेने देखील सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ६ जुलैला देशातील सर्व विद्यापीठांना परीक्षा घेणे बंधनकारक असल्याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन युवासेनेने यूजीसीच्या ६ जुलैच्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्याचबरोबर देशभरातून प्रणिथ के. आणि अन्य काही व्यक्तींमार्फत याचिका करण्यात आल्या होत्या. यात देशातील ३१ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ही याचिका आणि युवासेनेची याचिका याचबरोबर देशातील अन्य याचिका एकत्रित करून त्यावर सोमवारी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2D63iz9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments