दहावी निकाल: कशी कराल ऑनलाइन गुणपडताळणी?

कोविड - १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना https://ift.tt/2DB6WB5 या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. महत्त्वाच्या तारखा - गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२० छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत - ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२० श्रेणीसुधार योजना मार्च २०२० परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी श्रेणी / गुणसुधार योजनेसाठी उपलब्ध राहतील. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना आपला निकाल सुधारायचा असेल ते विद्यार्थी लगतच्या दोन परीक्षा देऊन आपली टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करू शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2X6Iajr
via IFTTT

Post a Comment

0 Comments