JEE Main, NEET चा सिलॅबसही होणार कमी?

JEE Main, syllabus: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ () ने शैक्षणिक सत्र २०२० - २१ साठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा सिलॅबस कमी करण्यात आला आहे. कोविड - १९ महामारीमुळे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास होणाऱ्या विलंबामुळे हा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. सीबीएसईच्या या निर्णयानंतर आता मेडिकल आणि इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षांबाबत (NEET आणि ) देखील प्रश्न उपस्थित होत आहे. नीट आणि जेईई मेनमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमातून विचारले जातात. अशात जर देशातील सर्वात मोठं बोर्ड असलेल्या सीबीएसईने अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे तर साहजिक आहे त्याचा परिणाम नीट आणि जेईई मेनवर देखील होणार आहे. यासाठी आता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कोचिंग क्लासेसना देखील अशी अपेक्षा आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी देखील नीट आणि जेईई मेनच्या अभ्यासक्रमासंबंधी लवकरच महत्त्वाचा निर्णय घेईल. सोशल मीडियावर देखील ही मागणी जोर धरत आहे. मंगळवारी रात्री ट्विटरसह काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नीट आणि जेईई मेनचा अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी केली जात आहे. च्या वेबसाइटवर जाण्यासाठी CBSE च्या वेबसाइटवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3egOI4y
via IFTTT

Post a Comment

0 Comments