NTA ने दिली 'या' परीक्षांच्या अर्जात दुरुस्तीची संधी

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सोमवारी विविध परीक्षा अर्जांमध्ये दुरुस्तीची सुविधा खुली केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी IGNOU PhD, OPENMAT MBA प्रवेश परीक्षा, , JNUEE, UGC NET, CSIR आणि AIAPGET या परीक्षांसाठी अर्ज केला आहे, ते विद्यार्थी त्या त्या परीक्षांच्या पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जात बदल करू शकतात. या दुरुस्तींसाठी अखेरची मुदत १५ जुलै २०२० आहे. एनटीएने यासंदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. यानुसार, 'कोविड - १९ महामारीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाइन अर्जांमध्ये दुरुस्ती करताना समस्या आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाइन अर्जांमधील दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे. हे ऑनलाइन अर्ज ६ जुलै २०२० ते १५ जुलै २०२० या कालावधीत या दुरुस्तीसाठी खुले करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी त्या त्या संकेतस्थळावर जाऊन अर्जांमध्ये आवश्यक असल्यास दुरुस्ती कराव्यात.' या नोटीशीत पुढे असंही म्हटलं आहे की, 'विद्यार्थ्यांना जवळचं परीक्षा केंद्र देण्याचा सर्वतोपरि प्रयत्न एनटीएने केला आहे. मात्र जेथे प्रशासकीय कारणांमुळे शक्य नसेल, तेथे अन्य शहर परीक्षा केंद्र म्हणून अलॉट करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र अलॉटमेंटचा अंतिम निर्णय घेईल.' हेही वाचा: जर अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज असेल तर त्यासाठीही अर्जात व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थी क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI आणि PAYTM द्वारे पेमेंट करू शकतात. हेही वाचा: परीक्षा आणि त्यांच्या वेबसाइट्स - Indira Gandhi National Open University (IGNOU) PhD आणि OPENMAT (MBA) Entrance Examination-2020: ignouexams.nta.nic.in Indian Council of Agricultural Research (ICAR) AIEEA 2020: icar.nta.nic.in Jawaharlal Nehru University Entrance Examination (JNUEE)-2020: jnuexams.nta.nic.in UGC-National Eligibility Test (UGC-NET) -June 2020: ugcnet.nta.nic.in Joint CSIR-UGC NET Examination(CSIR-UGC NET)-June 2020: csirnet.nta.nic.in All India AYUSH Post Graduate Entrance Test (AIAPGET)- 2020: ntaaiapget.nic.in


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2O3V7pe
via IFTTT

Post a Comment

0 Comments