Online Ram Leela Classes: परदेशी विद्यार्थ्यांसाठी रामलीलाचे वर्ग!

Online Classes: अयोध्या रिसर्च सेंटरने परदेशी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे. सहा महिन्यांच्या या अभ्यासक्रमात, भारतात रामलीला कशा प्रकारे आयोजित केली जाते, त्याचा अभ्यास घेतला जाईल. या महिन्याच्या सुरूवातीस ऑनलाइन वर्ग सुरू झाला असून अमेरिका, कॅनडा, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन देश आणि मॉरिशसमधील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.: संस्थेचे संचालक वाय.पी. सिंह म्हणाले की या प्रकल्पाची कल्पना लॉकडाऊनदरम्यान पुढे आली. लॉकडाउनच्या काळात देशातील अनेक ऑनलाइन वर्गांच्या संकल्पनेला प्राधान्य मिळाले. त्यांनी सांगितले, 'आतापर्यंत दोन वर्ग झाले आहेत. आम्ही भारतात रात्रीचे वर्ग आयोजित करतो जेणेकरुन पाश्चात्य देशांतील विद्यार्थी सकाळी त्यास उपस्थित राहू शकतील. आम्ही रामलीला परदेशात घेऊन गेलो आहोत आणि आपल्याकडे परदेशातील अशा लोकांचे नेटवर्क आहे जे एकतर स्वत: राम लीलातील पात्र साकारतात किंवा राम लीला आयोजित करतात. जेव्हा आम्ही त्यांच्याशी या ऑनलाइन वर्गाच्या कल्पनेवर चर्चा केली तेव्हा त्यांचा प्रतिसाद सकारात्मक होता. ते म्हणाले की, दिवाळीच्या वेळी दीपोत्सवात असे किमान पाच गट आमंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना मेकअप आणि व्हॉईस मॉड्युलेशनविषयी सांगितले जाते. त्यांना सीतेचा पोशाख कसा शुर्पणखेपेक्षा कसा वेगळा आहे आणि रावणाचं हास्य रामापेक्षा कसं वेगळं असतं आदी बारकावे शिकवले जातात. उत्तर भारतात रामलीलेसाठी आवश्यक असलेल्या परिश्रमांची या विद्यार्थ्यांना माहिती आहे. गोरखपूरचे नाट्य कलाकार मानवेन्द्र त्रिपाठी हे स्वत: राम यांची भूमिका बजावतात. मेक-अप, डायलॉग डिलिव्हरी, सजावट, पोशाख, रंगमंच सजावट इत्यादींवर वर्गांची थेट सत्रे आयोजित केली जातात. मास्टर आर्टिस्ट सर्टिफिकेट कोर्स घेणा विद्यार्थ्यांना विविध प्लॅटफॉर्मवर काम करण्याची संधीही मिळणार आहे. या ऑनलाइन कोर्ससाठी अर्थसहाय्य सांस्कृतिक मंत्रालय पुरविते. येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही थेट वर्ग आयोजित केले जातील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gfQOmO
via IFTTT

Post a Comment

0 Comments