Also visit www.atgnews.com
पहिली ते दहावीसाठी SCERT चे चार युट्यूब चॅनेल
4 : मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी देखील सुरू होणार आहेत. अशा पद्धतीने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरू करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, 'इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्हीवर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत.' करोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले. मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. दरम्यान, जिओ टीव्हीवर देखील राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता तिसरी ते बारावीसाठी एकूण १२ वाहिन्या सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भातही वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले होते. राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पूर्व प्राथमिक वर्गांसाठीही ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आदेश जारी झाले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गाची वेळेची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन वर्गाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - वेळापत्रक पूर्व प्राथमिक - सोमवार ते शुक्रवार दररोज अर्धा तास पालक संवाद पहिली, दुसरी - सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासाची प्रत्येकी दोन सत्रे तिसरी ते आठवी - सोमवार ते शुक्रवार दररोज ४५ मिनिटांची दोन सत्रे नववी ते बारावी - ४५ मिनिटांची चार सत्रे कालावधी झाला कमी पूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग दोन तास भरायचे ते आता दीड तास भरणार आहेत. तर नववी ते बारावीचे वर्ग चार तासांऐवजी तीन तास भरणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग किती वेळ घेतले गेले पाहिजेत यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39qK8zZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments