AIMA MAT 2020: MBA प्रवेश परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी

MAT September 2020 : ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने मॅनेजमेंट अॅप्टीट्यूड टेस्ट २०२० (MAT 2020) च्या सप्टेंबर मध्ये होणाऱ्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. आइमाने मॅट ची अधिकृत वेबसाइट वर अॅडमिट कार्ड अपलोड केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते, ते आता आइमा मॅटच्या संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात किंवा या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या थेट लिंकवरून देखील अगदी सहजपणे अॅडमिट कार्ड मिळवू शकतात. कधी आणि कशी होईल परीक्षा? आइमाद्वारे मॅटच्या संगणकीकृत परीक्षेचे () आयोजन २७ ऑगस्ट २०२० पासून करण्यात आले आहे. ही परीक्षा २ सप्टेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आपल्या घरीच बसून किंवा जेथे इंटरनेट, संगणक आधी सुविधा आहे अशा कुठल्याही ठिकाणाहून परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. पूर्ण परीक्षा लाइव्ह व्हिडिओ आणि ऑडिओ फीडद्वारे मॉनिटर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या संगणकाच्या स्क्रीनचे देखील मॉनिटरिंग होणार आहे. अजूनही करू शकता अर्ज वेगवेगळ्या दिवशी होणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदतही वेगवेगळी आहेत. जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर तुमच्याकडे २९ ऑगस्टपर्यंतचा वेळ आहे. २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी २९ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करता येतील. कोणत्या दिवसाच्या परीक्षेसाठी कधीपर्यंत अर्ज? परीक्षा की तारीख - आवेदन की अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२० - २३ ऑगस्ट २०२० २८ ऑगस्ट २०२० - २४ ऑगस्ट २०२० २९ ऑगस्ट २०२० - २५ ऑगस्ट २०२० ३० ऑगस्ट २०२० - २६ ऑगस्ट २०२० ३१ ऑगस्ट २०२० - २७ ऑगस्ट २०२० १ सप्टेंबर २०२० - २८ ऑगस्ट २०२० २ सप्टेंबर २०२० - २९ ऑगस्ट २०२० विविध तारखेच्या परीक्षांसाठी अॅडमिट कार्डही वेगवेगळ्या वेळी जारी होणार आहेत. तूर्त २७ ऑगस्ट २०२०च्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले गेले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32i5CMc
via IFTTT

Post a Comment

0 Comments