अकरावी ऑनलाइन प्रवेश घरबसल्या; मार्गदर्शन केंद्रे, कॉलेजांची खेप टळली

FYJC Online Admission 2020: राज्यातील सहा महानगरपालिक आणि एमएमआर रिजनमधील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे उद्घाटन शनिवारी १ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. यंदा प्रथमच असे ऑनलाइन उद्घाटन करून ही प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यूट्युबच्या माध्यमातून या उद्घाटन कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारणही करण्यात आले. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना घरबसल्या अकरावी प्रवेश घेता येणार आहेत. मिळालेला प्रवेश निश्चित करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी त्यांना कुठेही धावाधाव करण्याची गरज पडणार नाही. या सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महानगरपालिकांच्या क्षेत्रातील ११वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भाग - १ शनिवार १ ऑगस्टपासून भरता येणार आहे. अर्ज कसा भरायचा, कॉलेजांचे पसंतीक्रम (म्हणजे भाग - २) भरण्यापूर्वी काय तयारी करायची, कोणती काळजी घ्यायची या सर्वांचे सादरीकरण असलेला एक व्हिडिओदेखील प्रवेशाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. तक्रार निवारणाचा पर्याय ऑनलाइन प्रवेश संकेतस्थळावरच तक्रार निवारणाचा पर्याय देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल तर ते ती येथे नोंदवू शकतात. यापूर्वी यासाठी मार्गदर्शन केंद्रापर्यंत जावं लागत असे. विद्यार्थ्यांची ही खेप वाचवण्यात आली आहे. प्रमाणपत्र पडताळणीदेखील ऑनलाइन दरवर्षी अकरावी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे असले तरी विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन करावी लागत होती. यंदा ही पडताळणीदेखील ऑनलाइन होणार आहे. नो यूवर एलिजिबिलिटी मागील वर्षीच्या कॉलेज कट ऑफ नुसार विद्यार्थी आपले प्रेफरन्स टाकून त्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळतील का याचा अंदाज घेऊ शकतील आणि खात्री झाल्यावरच प्रवेश घेऊ शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XhlrRv
via IFTTT

Post a Comment

0 Comments