Also visit www.atgnews.com
जेईई, नीटच्या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करू द्या: शेलार
जेईई मेन ृ२०२० परीक्षा १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांनीच ट्विटरद्वारे ही माहिती दिली. 'नीट आणि जेईई मेन २०२० च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हॉ़ल तिकिटावर उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती आपण रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे,' असे ट्विट शेलार यांनी केले आहे. देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात येणारी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अर्थात या राष्ट्रीय परीक्षेला मंगळवार १ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. कोविड - १९ महामारी संसर्ग स्थितीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला कडाडून विरोध होत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्याने ही परीक्षा नियोजित वेळेत पार पडणार आहे. जेईईच्या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी आयआयटीयन्सचा ट्रॅव्हल अॅप मुंबईत लोकल सेवा बंद आहेत तसेच राज्यातील इतर भागातही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कसे पोहचायचे असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांसमोर आहे. यावर आयाअयटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तोडगा काढला असून स्वयंसेवकांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना प्रवास सेवा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी या विद्यार्थ्यांनी https://www.eduride.in/ हे वेब पोर्टल तयार केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34NXJRG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments