यूजीसी नेट, इग्नू ओपनमॅटसह सहा महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

NTA , & PhD, DU Entrance Test & Various Exams dates: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सहा महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. यात दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा ( 2020), यूजीसी नेट जून २०२० (UGC NET June 2020), इग्नू ओपनमॅट आणि पीएचडी (IGNOU Openmat 2020 आणि IGNOU PhD 2020) सह अन्य परीक्षांचा समावेश आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर नव्या तारखांबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यात प्रत्येक परीक्षेचे शेड्युल, त्याची वेबसाइट आणि ऑफिशिअल ईमेल आयडीची माहिती देण्यात आली आहे. या वृत्तात तुम्हाला एनटीएद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाची लिंकही देण्यात येत आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करु शकता. Exams 2020: कधी होणार कोणती परीक्षा? दिल्ली विद्यापीठ प्रवेश परीक्षा (DUET 2020) - ६ ते ११ सप्टेंबर २०२० आयसीएआर एआयईईईए (ICAR AIEEA 2020 UG) - ७ आणि ८ सप्टेंबर २०२० इग्नू ओपनमॅट एमबीए एन्ट्रन्स एग्जाम (IGNOU OPENMAT 2020) - १५ सप्टेंबर २०२० यूजीसी नेट जून 2020 (UGC NET 2020 June) - १६ ते १८ सप्टेंबर २०२० आणि २१ ते २५ सप्टेंबर २०२० आयुष पीजी एंट्रन्स टेस्ट (AIAPGET 2020) - २८ सप्टेंबर २०२० इग्नू पीएचडी एंन्ट्रन्स एक्झाम (IGNOU PhD 2020) - ४ ऑक्टोबर २०२० हेल्पलाइन क्रमांक एनटीएच्या या परीक्षांसंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर थेट एनटीएशी संपर्क साधता येईल. यासाठी तुम्हाला परिपत्रकात दिलेल्या परीक्षांसंबंधी ईमेल आयडीवर मेल पाठवून माहिती मिळवता येईल. तुम्ही पुढे दिलेल्या क्रमांकांवर कॉल करून देखील माहिती मिळवू शकता - ८२८७४७१८५२ ८१७८३५९८४५ ९६५०१७३६६८ ९५९९६७६९५३ ८८८२३५६८०३ NTA च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी NTA exam schedule notice


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34kqDs9
via IFTTT

Post a Comment

0 Comments