Also visit www.atgnews.com
यूपीएससीच्या निकालात १३ वर्षांनी मिळालं नागालँडला स्थान
Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यशस्वी उमेदवारांमध्ये १३३ व्या स्थानी नागालँडचा उमेदवार आहे. नागालँडला तब्बल १३ वर्षांच्या खंडानंतर यूपीएससीच्या रँकिंगमध्ये स्थान मिळालं आहे. रिचर्ड यानथन असे या यशस्वी उमेदवाराचे नाव आहे. नागालँडच्या वोखा जिल्ह्यातील लाखुती गावात राहणाऱ्या रिचर्ड यानथन यांनी १३३ वा रँक मिळवला आहे. नागालँडचे मुख्यमंत्री नीफ्यू रियो यांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल रिचर्ड यांचे अभिनंदन केले आहे. रियो यांनी ट्वीट केलं आहे, 'चांगल्या रँकसह यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल रिचर्ड यानथन यांचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही आव्हाने आणि संधीच्या जगात पाऊल ठेवलं आहे. मी देशसेवेत तुमचं निरोगी स्वास्थ्य आणि विवेकाची कामना करतो. यूपीएससी - २०१९ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांची मी अभिनंदन करतो.' यानथनने सिव्हील इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक्. केलं आहे आणि ते सध्या नागालँड सरकारमध्ये अतिरिक्त सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांची आई शिलुमेनला लोंगचारीदेखील सरकारी नोकरीत आहेत आणि नागालँड सरकारमध्ये उपसचिव पदावर कार्यरत आहे. यानथन यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांना आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33AHtCG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments