ऑल इंडिया लॉ प्रवेश परीक्षा लांबणीवर

Postponed: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU) दिल्लीने AILET 2020 एन्ट्रन्स एक्झाम स्थगित केली आहे. १८ ऑगस्ट रोजी होणार होती. CLAT 2020 परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामागोमाग ही लॉ ची दुसरी प्रवेश परीक्षाही लांबणीवर पडली. अधिकृत माहितीनुसार, परीक्षेआधी दहा दिवस नोटीस जारी करून परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात येईल. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीने नोटिफिकेशनमध्ये लिहिलंय, 'AILET 2020 च्या सर्व उमेदवारांना असं सूचित केलं जातं की कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रक लवकरच जारी केलं जाईल.' AILET 2020 साठी ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवारांना आवाहन करण्यात आलं आहे की AILET 2020 शी संबंधित ताज्या माहितीसाठी युनिव्हर्सिटीचे संकेतस्थळ पाहात राहा. CLAT 2020 परीक्षाही स्थगित कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT 2020) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, बंगळुरूने २२ ऑगस्ट २०२० रोजी होणारी परीक्षा तूर्त तरी स्थगित केली आहे. यापूर्वी ही परीक्षा १० मे रोजी होणार होती. तेव्हाही ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोविड - १९ महामारी संक्रमण स्थिती सामान्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. यात असं म्हटलं आहे की परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा १ सप्टेंबर रोजी केली जाईल. विद्यार्थी consortiumofnlus.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर नवं वेळापत्रक १ सप्टेंबर नंतर पाहू शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gA6NfY
via IFTTT

Post a Comment

0 Comments