मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; कट ऑफमध्ये वाढ

मुंबई विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी ३ वाजता जाहीर झाली. महाविद्यालयांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर मेरिट लिस्ट जाहीर केली. सर्व कॉलेजांमधील कला शाखेच्या कट ऑफमध्ये वाढ झाली आहे. माटुंगा येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालय वगळता सर्व ठिकाणी कला शाखेची कट ऑफ टक्केवारी वाढली आहे. वाणिज्य शाखांच्या प्रवेशांच्या कट-ऑफमध्येही सरासरी १ टक्क्याने वाढ झाली आहे. विज्ञान शाखेच्या प्रवेशांची कट-ऑफ संमिश्र आहे. काही ठिकाणी विज्ञान शाखेची कट ऑफ वाढली आहे, तर काही महाविद्यालयांमध्ये कमी आहे. विद्यार्थ्यांनी आज जाहीर झालेल्या यादीनुसार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणी करून शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे. मुंबईतल्या काही नामांकित कॉलेजांची कट-ऑफ टक्केवारी पाहण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे - प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे - अर्ज विक्री - २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) - २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत) प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे - २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत) पहिली गुणवत्ता यादी - ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत) दुसरी गुणवत्ता यादी - ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत) तिसरी गुणवत्ता यादी - १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत) विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची यादी पाहण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Pv62c4
via IFTTT

Post a Comment

0 Comments