Also visit www.atgnews.com
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे मोबाइल अॅप
विद्यार्थी करोना संसर्ग स्थितीमुळे यंदा घरूनच काम करत आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने एक मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. भूगोलाच्या अभ्यासक्रमात सर्व्हे करावे लागतात. यासाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे. हे मोबाइल अॅप विद्यार्थ्यांना सर्व्हेला लागणारी माहिती गोळा करण्यात मदत करेल. बारावीच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना १५ घरांचे सर्वेक्षण करावे लागते. आतापर्यंत विद्यार्थी हे सर्वेक्षण पेन-पेपरच्या सहाय्याने करत होते. 'विद्यार्थी सध्या त्यांच्या मोबाइल फोनचा वापर करत अभ्यास करत आहेत. त्यामुळे हे अॅप त्यांना खूपच उपयोगी पडणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना घरबसल्या सर्व्हेसाठी माहिती गोळा करण्यासाठी हे अॅप उपयोगी पडणार आहे. मिळालेली माहिती विद्यार्थ्यांना एक्सेस शीटवर एकत्र करण्यास या अॅपची मदत होईल,' अशी माहिती बालभारतीच्या एका अधिकाऱ्याने दिली. या अॅपचं नाव जिओसर्व्हे (Geosurvey) असं आहे आणि गुगल प्ले स्टोरवर हा अॅप उपलब्ध आहे. शिक्षकांसाठी देखील त्यांचं व्हर्जन आहे. हे अॅप लाँच केल्याच्या एका आठवड्याच्या आत १,४७५ विद्यार्थ्यांनी आमि ५५७ शिक्षकांनी ते डाऊनलोड करून वापरायला सुरूवात केली आहे. या अॅपवर पाठ्यपुस्तकातील प्रात्यक्षिकांसंबधीची प्रश्नोत्तरेदेखील उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार अॅपमध्ये बदलही करु शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jnLD5x
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments