Also visit www.atgnews.com
स्टाफ सिलेक्शन कमिशन: सीजीएल (टीयर ३) परीक्षेची तारीख जाहीर
SSC CGL (Tier 3) 2019 exam date: (SSC) ने कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ची तारीख जाहीर केली आहे. कर्मचारी भरती आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ही २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 'कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ रविवारी २२ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचा निर्णय कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे. टीयर १ परीक्षेत पात्र ठरलेले सर्व उमेदवार टीयर २ आणि टीयर ३ परीक्षांना बसण्यास पात्र आहेत.' हे वेळापत्रक भविष्यात कोविड -१९ संसर्ग स्थिती आणि सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलू शकतं, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे. उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावी. परीक्षेच्या संबंधी कोणतीही माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन आपल्या वेबसाइटद्वारेच जारी करते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YGC8qt
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments