बारावी उत्तीर्णांसाठी सैन्य दलात संधी

भारतीय सैन्य दलात टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. केवळ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विष घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतील. प्रशिक्षण जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या. टेक्निकल ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते. यापैकी १ वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग तर चार वर्षे टेक्निकल ट्रेनिंग दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांना सैन्यदलात लेफ्टनंटपदी रुजू केले जाते. एकूण रिक्त जागा - ९० वयोमर्यादा - २ जुलै २००१ ते १ जुलै २००४ या कालावधीत जन्म झालेले पुरुष उमेदवार अर्ज करू शकतील. शैक्षणिक पात्रता - बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिकस् विषयांचे मिळून सरासरी किमान ७० टक्के गुण अनिवार्य. अर्ज कसा करायचा? सैन्य दलाचे अधिकृत संकेतस्थळ https://ift.tt/166cffQ वर जाऊन online application पर्यायावर क्लिक करावे. आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज करावी. अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये आहे. नोटिफिकेशनची लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि शॉर्टलिस्टमधील उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्यात येईल. मुलाखत प्रक्रिया ऑक्टोबर २०२० नंतर सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत - ९ सप्टेंबर २०२०


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lfxGIE
via IFTTT

Post a Comment

0 Comments