मुंबई विद्यपीठाच्या प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ

FY admission 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नोंदणी करण्याची मुदत विद्यापीठाने एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी २४ जुलै पासून सुरू झाली आहे. पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पहिली मेरीट लिस्ट ४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार होती. प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे - अर्ज विक्री - २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) - २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत) प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे - २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत) पहिली गुणवत्ता यादी - ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत) दुसरी गुणवत्ता यादी - ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत) तिसरी गुणवत्ता यादी - १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क - १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kam616
via IFTTT

Post a Comment

0 Comments