IIM CAT 2020 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरूवात

application: भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (कॅट २०२०) साठी नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी / अर्ज आज ५ ऑगस्ट २०२० पासून कॅटच्या अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर अॅक्टिव्ह करण्यात आला आहे. आता उमेदवार वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकतात. किंवा या बातमीत दिलेल्या लिंकवरून अर्ज प्रक्रिया देखील पूर्ण करता येऊ शकेल. आयआयएम कॅट 2020 साठी महत्त्वाच्या तारखा कॅट २०२० साठी ऑनलाईन नोंदणी ५ ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२० (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) आहे. अॅडमिट कार्ड आयआयएम कॅटच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन जारी केले जातील. अर्जदार त्यांचे प्रवेश पत्र २८ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून iimcat.ac.in वरून डाउनलोड करू शकतील. रविवार, २९ नोव्हेंबर२०२० रोजी देशभरातील १५६ शहरांमधील शेकडो केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन सत्रांत परीक्षा घेण्यात येईल. CAT 2020: पुढील आयआयएममध्ये मिळणार प्रवेश आयआयएम अहमदाबाद ( Ahmedabad) आयआयएम अमृतसर (IIM Amritsar) आयआयएम बंगळुरू (IIM Bengaluru) आयआयएम बोधगया (IIM Bodhgaya) आयआयएम कोलकाता (IIM Calcutta) आयआयएम इंदूर (IIM Indore) आयआयएम जम्मू (IIM Jammu) आयआयएम काशीपुर (IIM Kashipur) आयआयएम कोझीकोड (IIM Kozhikode) आयआयएम लखनऊ (IIM Lucknow) आयआयएम नागपुर (IIM Nagpur) आयआयएम रायपुर (IIM Raipur) आयआयएम रांची (IIM Ranchi) आयआयएम रोहतक (IIM Rohtak) आयआयएम संबलपुर (IIM Sambalpur) आयआयएम सिरमौर (IIM Sirmaur) आयआयएम तिरुचिरापल्ली (IIM Tiruchirapalli) आयआयएम उदयपुर (IIM Udaipur) आयआयएम विशाखापट्टनम (IIM Vishakhapattanam) CAT 2020 साठी आयआयएम कॅट वेबसाइटवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2DxI3Xd
via IFTTT

Post a Comment

0 Comments