Also visit www.atgnews.com
MBBS: विनापरीक्षा प्रमोट केले जाणार नाही, MCI चा निर्णय
mandatory: मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (MCI) ने एमबीबीएस करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यात एमसीआय (Medical Council Of India) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सने एमबीबीएस युनिव्हर्सिटी / कॉलेड परीक्षा आणि एक्स्टर्नल एक्झामिनर्ससंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या अॅडव्हायजरीनुसार, कोणताही एमबीबीएस अभ्यासक्रम करत असलेला विद्यार्थी परीक्षेशिवाय पुढच्या स्तरावर जाऊ शकत नाही. महाविद्यालयांसाठी एमबीबीएस परीक्षांचे आयोजन करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा देणे आवश्यक आहे. कधी होणार परीक्षा? अॅडव्हायजरीत असं म्हटलं आहे की महाविद्यालये उघडल्यानंतर दोन महिन्यांच्या आत एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात. त्यानंतर एका महिन्याच्या आत फर्स्ट एमबीबीएस युनिव्हर्सिटी परीक्षा घेतल्या जाव्यात. सवलत कुठे? एमसीआय बोर्ड ऑफ गव्हर्नन्सने मेडिकलच्या एमबीबीएस परीक्षांमध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत देखील दिली आहे. ही सूट एक्स्टर्नल परीक्षांसाठी एक्झामिनर्सची नियुक्ती आणि परीक्षेच्या पॅटर्नसंदर्भात आहे. पीजी मेडिकल फायनल इयर परीक्षांच्या धर्तीवर एमबीबीएस युनिव्हर्सिटी परीक्षा घेतल्या जाव्यात. जर करोनामुळे एक्सटर्नल एक्झामिनर्स राज्याच्या बाहेरून उपलब्ध होत नसतील, तर त्याच राज्यातील अन्य विद्यापीठातून परीक्षक बोलावले जाऊ शकतात. या एक्स्टर्नल एक्झामिनर्सना परीक्षेच्या वेळी स्वत: जागेवर शारिरिक रुपात उपस्थित राहावं लागेल. जर हे शक्य नसेल तर अर्धे एक्झामिनर्स जागेवर उपस्थित राहतील तर उर्वरित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होतील. याव्यतिरिक्त क्लिनीकल / प्रॅक्टिकल परीक्षांसाठी OCSE / OSPE , सिम्युलेशन, केस सिनारिओ आदी पद्धतींचा वापर करता येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XrIWrq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments