Also visit www.atgnews.com
NIOS बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) चा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला. बोर्डाचा निकाल बोर्डाच्या results.nios.ac.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा निकाल विलंबाने जाहीर करण्यात आला आहे. NIOS Class 12 Result 2020: असा पाहा निकाल - - सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ results.nios.ac.in वर जा. - यानंतर रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. - येथे तुमचा रोल नंबर देऊन सबमीट करा. - रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल. NIOS च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आधी मार्च महिन्यात होणार होत्या. मात्र करोना संसर्गामुळे त्या स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर बोर्डाने या परीक्षा १७ जुलै ते १३ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. पण कोविड - १९ विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत नसल्याने अखेर NIOS बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर NIOS बोर्डाने विद्यार्थ्यांना मागील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करून गुण देण्याचा निर्णय घेतला. बोर्डाने हेही जाहीर केले आहे की करोना संक्रमण स्थिती सामान्य झाल्यानंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i7unkw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments