जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

JEE Advanced official answer key 2020: जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन अॅडव्हान्स्ड अर्थात परीक्षेची संभाव्य आन्सर की म्हणजेच उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. आयआयटी दिल्लीने जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in येथे जेईई अॅडव्हान्स्ड २०२० पेपर १ आणि २ च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका जारी केली आहे. उमेदवारांना उत्तरतालिकेवर काही हरकती असतील तर त्या नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. तुम्ही जेईई अॅडव्हान्स्डच्या वेबसाइटवर जाऊन या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकता. सोबतन उत्तरतालिकाही पाहू शकता. उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया देखील जेईई अॅडव्हान्स्ड कँडिडेट पोर्टलद्वारे ऑनलाइन माध्यमातू पूर्ण केली जा़ाऊ शकते. या सगळ्या प्रक्रियेसाठी थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. पुढे दिलेल्या लिंक्सववर क्लिक करून तुम्ही पेपर आणि उत्तर तालिका डाऊनलोड करू शकता. उत्तरतालिकेवर हरकतीदेखील नोंदवू शकतात. हरकती नोंदवण्यासाठी १ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतचा अवधी आहे. उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा - प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा - पेपर - 1 पेपर - 2 उत्तरतालिकेवर हरकत घेण्यासाठी च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33d8Ja0
via IFTTT

Post a Comment

0 Comments