Also visit www.atgnews.com
सीबीएसई बारावी फेरपरीक्षेचा निकाल कधी? बोर्डाने दिली माहिती
Compartment Exams 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षांच्या निकालाबाबत माहिती दिली आहे. बोर्डाने २४ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाला यासंदर्भातील माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई कंपार्टमेंट निकाल आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रथम वर्षाच्या शैक्षणिक कॅलेंडर २०२०-२१ संबंधी दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. कोविड - १९ विषाणूच्या संक्रमणामुळे परिस्थिती सामान्य नाही. सीबीएसईच्या कंपार्टमेंट परीक्षाही यामुळे विलंबाने सुरू झाल्या. परिणामी निकालाला विलंब होईल. अशातच यूजीसीच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार जर विद्यापीठांमधील प्रथम वर्ष प्रवेश बंद झाले, तर सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल, अशी भीती या याचिकेच व्यक्त करण्यात आली आहे. न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. खंडपीठाने सीबीएसईला सांगितले होते की फेरपरीक्षांच्या निकालाचा निश्चित कालावधी सांगा, जेणेकरून यूजीसीला त्याअनुसार निर्णय घेता येईल. याच्या उत्तरादाखल सीबीएसईने सांगितले की बारावीच्या फेरपरीक्षेच्या म्हणजेच कंपार्टमेंट परीक्षेच्या निकालाची घोषणा १० ऑक्टोबर २०२० किंवा त्यापूर्वी केली जाईल. दुसरीकडे, यूजीसीद्वारे जारी करण्यात आलेल्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार, प्रथम वर्ष पदवी प्रवेशांची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२० आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/363MNQw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments