Also visit www.atgnews.com
यूपीएससी पूर्व परीक्षा लांबणीवर पडणार? सुनावणी २८ सप्टेंबरला
Civil Services Prelims 2020 Exam Update: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० च्या तारखेत कदाचित पुन्हा फेरबदल होऊ शकतो. परीक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवा आयोगाला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. कोर्टाने एका याचिकेसंदर्भातील सुनावणीच्या वेळी आयोगाला आपले म्हणणे दाखल करण्यास सांगितले आहे. सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा २०२० दोन ते तीन महिने स्थगित करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखर करण्यात आली आहे. यूपीएससीच्या २० उमेदवारांच्या वतीने वकील अलख आलोक श्रीवास्तव हा खटला चालवत आहेत. कोविड-१९ महामारी आणि देशातील विविध राज्यांमध्ये आलेला पूर या पार्श्वभूमीवर परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. याचिकेत म्हटलं आहे की परीक्षेसाठी केंद्रांची संख्याही खूप कमी आहे. सध्या परिस्थिती सामान्य नाही. अशात उमेदवारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना समस्या येऊ शकतात. गुरुवारी २४ सप्टेंबर २०२० रोजी न्या. ए.एम. खानविलकर आणि न्या. खन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी दिली. खंडपीठाने यूपीएससीला नोटीस पाठवून या प्रकरणी उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे. विद्यमान वेळापत्रकानुसार, यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० रोजी ऑफलाइन मोडवर होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ६ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. देशभरात ७२ शहरांमध्ये परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2G7EacM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments