अनाथ विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहू द्यावे; धनंजय मुंडे यांचे आदेश

करोनामुळे वसतीगृहात राहणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना होस्टेल सोडण्यासाठी समाज कल्याण विभागाची विद्यार्थ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. प्रहार विद्यार्थी संघटनेने या प्रकरणाला वाचा फोडली. आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात धाव घेतली. आणि अजय तापकीर यांच्या नेतृत्वाखाली प्रहार विद्यार्थी संघटनेने आज गुरुवारी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. अनाथ विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहू द्यावे आणि त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करावी, असे आदेश मुंडे यांनी दिले. यावेळी सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी लगेच दखल घेऊन धनंजय मुंडेंप्रमाणेच भूमिका घेतली. या विद्यार्थ्याना वसतीगृहात राहू द्यावे व जेवणाची सुद्धा व्यवस्था करावी अशी भूमिका त्यांनी घेतली आणि बोलल्या. करोना महामारी मुळे समाज कल्याण विभागाची हॉस्टेल व मेस बंद करण्यात आली आहेत, या हॉस्टेल मध्ये अनेक अनाथ विद्यार्थी राहतात या विदयार्थ्यांवर उपासमारी ची वेळ आली आहे, त्यात सामाजिक न्याय विभागाने आता हॉस्टेल सोडून जाण्यासाठी नोटीस पाठवायला सुरवात केल्याने या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. हेही वाचा: अनाथ विद्यार्थ्यांना होस्टेल मध्ये राहू द्यावे व त्यांच्यासाठी मेस सुरू करावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष ऍड. मनोज टेकाडे यांनी केली आहे, अनाथ विद्यार्थी हे शिक्षणसाठी हॉस्टेल मधे राहतात व अजून कॉलेजेस सुरू झाले नाहीत, या विद्यार्थ्यांचे आई वडील किंवा परिवार नाही त्यामुळे सरकारने त्यांची व्यवस्था करावी अन्यथा या विदयार्थ्यांना घेऊन मंत्री बंगल्यावर राहण्यास येऊ असा इशाराही प्रहार प्रवक्ता ऍड. अजय तापकीर यांनी दिला होता. या भेटी दरम्यान प्रहार विद्यार्थी संघटनेचे राज्यअध्यक्ष मनोज टेकाडे ,सरचिटणीस अजय तापकीर ,मुंबई अध्यक्ष महेश दाभोलकर,नवीमुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर,वरळी, कांदिवली, जोगेश्वरी,चेंबूर येथील अनाथ विद्यार्थी ही उपस्थित होते


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2G30HY4
via IFTTT

Post a Comment

0 Comments