कसा होता जेईईचा बीई / बीटेक पेपर? जाणून घ्या...

BE/BTech exam : देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE Main परीक्षा १ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. बुधवारी २ सप्टेंबर पासून बीई बीटेक अभ्यासक्रमांचे पेपर सुरू झाले आहेत. देशभरात ६६० परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत ही परीक्षा झाली. जेईई मेन परीक्षेसाठी सुमारे ९ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कसा होता बीई/बीटेकचा पेपर? परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर १ खूप जास्त कठिण नव्हता, मात्र खूप सोपाही नव्हता. मध्यम काठिण्य पातळीचा हा पेपर होता. अकरावी आणि बारावी दोन्हीच्या अभ्यासक्रमातील टॉपिक्सवर सारख्याच वेटेजचे प्रश्न विचारण्यात आले होते. केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सच्या तुलनेत फिजिक्सचा पेपर अधिक कठिण होता. मॅथ्स आणि केमिस्ट्रीतील न्यूमरिकल प्रश्न सोडवण्यास सोपे होते. NCERT मधून रसायनशास्त्रातील ६० ते ७० टक्के प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षा केंद्रांवर करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत विद्यार्थी समाधानी होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले होते. काही केंद्रांवर परीक्षा संपल्यानंतर मात्र गर्दी झाली आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32Jjdwk
via IFTTT

Post a Comment

0 Comments