सीबीएसई दहावी, बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Compartment Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा म्हणजेच फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाने आपले अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दोन्ही इयत्तांच्या परीक्षांचे स्वतंत्र वेळापत्रक जारी केले आहे. यावर्षी दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल. संपूर्ण वेळापत्रक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या स्वतंत्र लिंक्स आहेत. या लिंकवर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात. दरम्यान, या परीक्षांना विद्यार्थी-पालकांकडून जोरदार विरोध होत आहे. या परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारी काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणीदेखील झाली. न्यायालयाने सीबीएसईला ७ सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. दहावी आणि बारावीचे मिळून २,३७,८४९ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणी लागू आहे. CBSE 10th compartmment date sheet 2020 डाऊनलोड करण्यासाठी CBSE 12th compartment date sheet 2020 डाऊनलोड करण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2F3FOM6
via IFTTT

Post a Comment

0 Comments