एक उमेदवार, ३४ हॉलतिकीटं! आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ थांबेना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेत काही उमेदवारांना एक, दोन नव्हे तर तब्बल २५ ते ३४ हॉलतिकीट आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नेमके कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची हे समजत नाही. गुरुवारी या परीक्षार्थीचे हॉलतिकीटच दिसत नव्हते त्यामुळे अधिक संभ्रम वाढला. सायंकाळी अखेर उशिरा त्यांच्या लॉगिनला हॉलतिकीट उपलब्ध झाले. या सगळ्या गोंधळात परीक्षार्थी उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागातील विविध पदासाठी परीक्षेतील गोंधळाची परंपरा 'ड' संवर्गातील विविध पदांसाठी रविवारी होणाऱ्या परीक्षेतही कायम आहे. २४ ऑक्टोबर रोजीही प्रश्नपत्रिका उशिरा येण्याचे प्रकार समोर आले तर ड संवर्गातील पदासाठी होणाऱ्या परीक्षेत एकाच परीक्षार्थी विद्यार्थ्याला अनेक हॉलतिकीट आल्याचा प्रकार समोर आला आहे. असे आनखी काही उमेदवार असल्याचेही परीक्षार्थी उमेदवारांचे म्हणणे आहे. बीड जिल्ह्यातील पृथ्वीराज गोरे याला ३४ हॉलतिकीट आले. प्रत्येकावर परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक वेगळा असल्याने कोणत्या ठिकाणी परीक्षा द्यायची असा प्रश्न त्याला पडला. गुरुवारी त्याने संबंधित प्रशासनाला विचारना केली परंतु दिवसभर त्याला योग्य उत्तरे मिळाले नाहीत. हा प्रकार समोर आल्यानंतर त्याचे हॉलतिकीट ओपनच होत नव्हते. त्यामुळे अधिक संभ्रम वाढला. त्याने पुन्हा संपर्क साधत अडचण मांडली. त्यावेळी त्याचा मोबाइल नंबर, ई-मेल मागून घेण्यात आला असे त्याने सांगितले. परीक्षा जवळ आल्याने त्याचा अभ्यास करायचा सोडून याच प्रक्रियेत त्याचा वेळ जात असल्याचे त्याने सांगितले. सुरुवातीपासून परीक्षा वादात सापडली आहे. २४ सप्टेंबररोजी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली त्यावेळीही विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. हॉलतिकीट कधी ३४ व कधी ३३ दिसायचे. त्यानंतर मी संबंधितांना याबाबी ई-मेलद्वारे अडचणी कळविल्या. त्यानंतर काही वेळ हॉलतिकीटच ओपन होत नव्हते. सायंकाळी पाहिल्यानंतर हॉलतिकीट उपलब्ध झाले. यावेळी दुरूस्ती होऊन एकच हॉलतिकीट उपलब्ध झाले. पृथ्वीराज गोरे, परीक्षार्थी उमेदवार


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pN9mTi
via IFTTT

Post a Comment

0 Comments