Also visit www.atgnews.com
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितताच
म. टा. प्रतिनिधी, पुणे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आल्यानंतर, प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप अनिश्चितता आहे. प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार की पहिल्या फेरीतील प्रवेश जैसे थे राहणार, दुसऱ्या फेरीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल होईल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांमध्ये आहेत. त्यामुळे राज्यातील सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीमार्फत पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या महापालिकांच्या क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ५ लाख ५९ हजार १३० जागांवरील प्रवेशांसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार यंदा प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फे रीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. तर दुसऱ्या फेरीच्या प्रवेशांसाठी गुणवत्ता यादी १० सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आता मराठा आरक्षणाच्या निर्णयावर प्रवेश प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून आहे. प्रवेश प्रक्रियेत मुंबईमध्ये २ लाख ४८ हजार ८२०, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ८३ हजार ३२९, अमरावतीमध्ये १२ हजार १३८, औरंगाबादमध्ये १९ हजार ५५९, नागपूरमध्ये ३५ हजार ९६४ आणि नाशिकमध्ये २६ हजार १८ अशा ४ लाख २५ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या फेरीत कोट्यातील प्रवेशांसह १ लाख ४६ हजार १३० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत झालेल्या प्रवेशाचे किंवा पुढील फेरीत प्रवेशांचे काय होणार, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kGJrqs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments