Also visit www.atgnews.com
CAT 2020 परीक्षेसाठी आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात कॅट परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. २३ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता कॅटची अर्ज प्रक्रिया संपत आहे. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव अद्याप या परीक्षेसाठी अर्ज केला नसेल त्यांना आज अखेरची मुदत आहे. कारण आजपर्यंतची मुदत ही एकदा वाढवण्यात आली होती, त्यामुळे यापुढे ती वाढेल याची शक्यता कमी आहे. यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० रोजी ही मुदत संपली होती. त्यानंतर ती २३ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. ही परीक्षा संगणक आधारित आहे. कॅटच्या स्कोरवर बिझनेस आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरू झाली होती. कधी होणार परीक्षा? आयआयएम कॅट २०२० परीक्षा रविवार, २९ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. परीक्षेचे अॅडमिट कार्ड बुधवारी २८ ऑक्टोबर २०२० रोजी जारी केले जाणार आहेत. अर्ज यशस्वीपणे भरणारे उमेदवार आयआयएम कॅट २०२० च्या अधिकृत संकेतस्थळावरून २८ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपासून आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kHfCWV
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments